Attempt at Folk Literature-Powada...
This is a 'POWADA' that we had written on Engineering day in 2nd yr....
Poets:- Mangesh Phalke, Meenal Bagad, Kalpesh Baviskar, Tushaar Chitare and Rajish Wagh.
Tip:- The parts inside qoutes ("") are to be sung...
पहिली वहिली पृथ्वी अगदी ओसाड होती,
" होती पहिली पृथ्वी ओसाड,
त्यावर नव्हते एकही झाड,
ह्या पाशांतून मजला काढ,
म्हणे धरणी देवल फाड-फाड. "
अशी कळकळीची विनंती ऐकल्यावर,
देवांनी पृथ्वीला सुंदर बनवण्याचं ठरविले,
त्यासाठी त्यांनी विश्वकर्मा नावाचा एक गंधर्व नेमला.
" विश्वकर्म्याने केली सुरुवात ....३
पृथ्वी म्होरात,
नाही तुम्हा ज्ञात,
कीर्ती पहिल्या अभियंताची....२
पदवीधर ह्या गंधर्वाची...२
केले त्याने जग हे रूपवान जी जी जी ....२ "
तर अशा या सुंदर पृथ्वीच्या देवळाचा कळस म्हणून त्याने
भारताला बनवले.
" आपला देश सुद्धा लई भारी....२
बात त्याची पण काय न्यारी जिरह जिरह जी जी जी
जिरह जिरह जी जी जी "
आपल्या ह्या महान देशात विद्वानांची कमी नव्हती.
एका पेक्षा एक सरस असे बुद्धीमानी हिरे भारत मातेच्या पोटी जन्माला आले.
कर्नाटकातील एका गावात उदयास आलेला असाच एक सूर्य
भारताचा पहिला पदवीधर अभियंता ठरला.
" नाव त्याचं विश्वेश्वराय ........
हे नाव त्याचं विश्वेश्वराय, महती सांगू मी हो त्याची काय,
प्रगतीसाठी उचलिले पाऊल
लागली देशाला यशाची चाहूल "
विश्वेश्वरायांनी आपल्या युक्तीने व कार्याने साऱ्या जगाला विस्मयात टाकले. दही दिशांनी त्यांचे कौतुक झाले.
" कौतिक झाले जगात......
कौतिक झाले जगात....३
पडली गळ्यात,
मोठी सगळ्यात,
पदवी या भारतवर्षाची...२
होती त्या भारतरत्नाची....२
मिळविले इंग्रजांचे 'SIR' पद हि जी जी जी... "
अहो हे तर झाले पूर्वीचे अभियंते,
पण आजच्या अभियंत्यांचे काय...?
" जिथं पैसा दिसला तिथं गेला,
अभिमान देशाचा मेला. "
असा हा अभियंता पैशासाठी, नोकरीसाठी, परदेशात गेला.
" विदेशात जाऊन तो बसला,
भारतीय असा हो कसला जिरह जिरह जी जी जी... "
आपल्या ह्या देशाला विदेशी संकटांपासून मुक्त करण्यासाठी आपल्यालाच
आता जागे व्हावे लागेल.
" अभियंते चला व्हा जागे......
अभियंते चला व्हा जागे....३
पाहू नका मागे,
विश्व हे अवघे,
आहे तुम्हाला जिंकायचे..
ऋण फेडू या देशाचे...
परत करू देशाचे उपकार जी जी जी जी जी ....... "
Dhanyawaad...