वाटल नव्हत...
बरेच लिहिले तुला सुनावले,
तुझ्यावर लिहिन ठरवल होत.
कविता कसल्या, लेख काय,
एक ओळ ही साधी
इतकी अवघड असेल, वाटल नव्हत...
स्मरले तुला, मनी आठवले,
आपले नाते कैसे उमलले.
थट्टा मस्करी, रुस्वा फुगवा,
वादळी भांडणे परतवलेली.
सहल, सफरी, गप्पा गोष्टी,
थोड्या कटु, बर्याच मिष्टी.
गुम्फिन सारे शब्दां मधुनी, माहित होत...
घेता हाती लेखणी परी,
शब्द असे साथ सोडतील, वाटल नव्हत...
व्यक्त केल्या वाचून काही,
भाव माझे व्यर्थ नाही.
आज नहीं उद्या जरी कधी,
तुला कसे संगीन कसे नहीं.
धैर्या शिवाय जमणार नाही, समजल होत...
आज इतक्या कमी सोबती नंतर,
मन माझे असे सहज समजशील, वाटल नव्हत...
-Rj
No comments:
Post a Comment