Sunday, 12 January 2014

तेव्हा तिची कमी सलते . . .


नेहमीच्या गडबडीत बाहेर गेलो असताना
फुलवाल्याचे ते दुकान दिसते
दुर्लक्ष करण्याच्या प्रयत्नात असताना
ती गुलाबाची कळी नजरेस पडते
. . . . . . तेव्हा तिची कमी सलते.

कॉफी चा मग ओठी लावत असताना
पापणीची किनार हळूच भरते
दाटलेला कंठ मोकळा करत असताना
तिची आवडती कोल्ड कॉफी एकदम आठवते
. . . . . . तेव्हा तिची कमी सलते.

बाईक वर सकाळी कॉलेज ला जाताना
मन पावसाशिवायच चिंब भिजते
आणि चालवत असलो जरी कोसळत असताना
जाकीट काढून द्यायला मागे कुणीच नसते.
. . . . . . तेव्हा तिची कमी सलते.
 -Rj                                                   

No comments:

Post a Comment